खेड : तालुका क्रीडा परिषद व तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत खेड तालुक्यातील एफ. ई. एस.इंग्लिश मिडीयम स्कूल , फुरूस या हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी सांची सचिन शिर्के हिने तालुका स्तरीय अटीतटीच्या अंतिम सामन्यात विजय संपादन केला असून तिची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
जिल्हा क्रिडा कार्यालय रत्नागिरी मार्फत तालुकास्तरीय विविध क्रिडा स्पर्धा सुरू असून या स्पर्धा अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील संघ सहभागी झाले होते.यामध्ये 17 वर्षे वयोगटात सांची सचिन शिर्के हिने सहभाग घेतला होता.
बुध्दीजीवी वैचारिक वारसा असणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खेड शाखेचे कार्याध्यक्ष सचिन शिर्के यांची सांची शिर्के कन्या आहे.कुमारी सांची हिला शाळेच्या क्रिडा शिक्षिका नसीमा मसुरकर , मुख्याध्यापिका दरिना मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.










