राजापूर (वातार्हर): येथील राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या सभासदांची २९ वी अधिमंडळ बैठक रविवार १० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता राजापूर हायस्कुलच्या कलामंदिर सभागृहात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत मागील वार्षिक अधिमंडळ बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम करणे. दि. ३१ मार्च २०२३ अखेरच्या वार्षिक अहवाल, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद यांची नोंद घेणे, दि. ३१ मार्च २०२३ अखेरच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवाल / दोष अहवाल यांची नोंद घेणे. सन २०२२-२०२३ अखेर झालेल्या नफा विभागणीस मान्यता देणे व लाभांश जाहीर करणे. सन २०२३-२०२४ सालाकरिता वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देणे व सन २०२२-२०२३ मधील अंदाजपत्रकातील खर्चाची माहिती देणे व मान्यता घेणे. उपविधी दुरुस्ती प्रस्तावास मंजुरी देणे. संचालकांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची माहिती घेणे. सन २०२३-२०२४ सालाकरिता वैधानिक लेखापरीक्षक यांची नेमणूक करणे व मानधनास मान्यता देणे. सन २०२३-२०२४ सालाकरिता बाहेरील कर्जमर्यादा निश्चित करणे, सभासदांकडून ताळेबंद पत्रक व नफा – तोटा पत्रक यांस अनुसरून आलेल्या लेखी स्वरूपातील सूचना यांची वाचून नोंद घेणे आणि आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे आदी विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
या बैठकीला सर्व सभासदांनी उपस्थीत रहावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर यांनी केले आहे.












