ओणी येथे 12 व 13 सप्टेंबर रोजी 18 व्या प्रबोधनकार ठाकरे राज्यस्तयरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

 

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे वतीने ओणीच्या ज्ञानवंत अड. वासुदेव तुळसणकर ज्ञानसंकुलात 12 व 13 सप्टेंबर रोजी 18 व्या प्रबोधनकार ठाकरे राज्यस्तयरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा इयत्ता 11 वी ते 15 वी तसेच डी. एड., बी. एड,, अभियांत्रीकी विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. प्रत्येक महाविद्यालयातून दोन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. नूतन विद्यामंदिर ओणीच्या गुरूवर्य शहाजी भाऊराव खानविलकर सभागृहात ही स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेसाठी दिड जी. बी. डेटा…आयुष्य का फुकट घालवतोस बेटा?, कोणता झेंडा घेवू हाती?, संविधान खतरे मे – किती खरे किती खोटे ?, भारताची विदेश निती-पूरक की मारक?, लोकशाही लोकांची की शाही लोकांची.. या विषयावर ही स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेतून तीन सर्वोत्तम वक्ते निवडले जाणार असून त्यांना प्रत्येकी रोख रूपये 7 हजार 500, सन्नानचिन्ह, सन्मानपत्र असा प्रबोधनकार युवा वक्ता पुरस्कार 2023 ने गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात युवा वर्गात विद्यार्थीप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेचे नाव होत आहे. राज्यभरातून स्पर्धक या स्पर्धक सहभागी होत असतात. स्पर्धेसाठी 9 सप्टेंबर ही नाव नोंदणीची अखेरची तारीख राहणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी रूपये 100 असून स्पर्धेसाठी किमान सात मिनिटांचा व कमाल 10 मिनिटांचा वेळ असणार आहे. प्राथमिक फेरीतून अंतीम फेरीसाठी 21 सर्वोत्तम स्पर्धकांची निवड केली जाणार आहे.

या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रख्यात लेखक श्रीपाद सबनीस उपस्थीत राहणार आहेत. स्पर्धेच्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी प्रा. विनोद मिरगुले मोबा.9970953600, महेंद्र पवार मोबा.8149184864 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थाध्यक्ष अड. वासुदेव तुळसणकर, कार्यवाह गणपत जानस्कर, मुख्याध्यापक तानाजी शिंदे यानी केले आहे.