आबलोली | वार्ताहर : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षासाठीच्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच गुहागर तालुक्यातील पालपेणे हायस्कूलच्या भव्य क्रीडा मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेत कोळवली हायस्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने खो-खो या क्रीडा प्रकारामध्ये जबरदस्त कामगिरी करत व क्रीडा कौशल्य आणि दमदार चलाखी दाखवत अव्वल स्थान पटकावले. त्याचबरोबर मुलांच्या खो-खो संघानेही सेमी फायनल पर्यंत कडवी झुंज देऊन क्रीडा क्षेत्रातील शाळेच्या नावाचा दरारा कायम ठेवला आहे तालुकास्तरावर घवघवीत यश संपादन करणाऱ्या व उपस्थितांची वाहवा मिळवणाऱ्या मुलींच्या आणि मुलांच्याही संघाचे ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.शांताराम वाघे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री.बाबाजी मुंडेकर,सचिव श्री.नारायण मोहिते,सहसचिव श्री. शंकर जोशी,संस्थेचे सदस्य श्री.वासुदेव डिंगणकर, श्री.नंदकिशोर सुर्वे,श्री.दामोदर डिंगणकर,श्री.रामचंद्र मोरे,श्री.सदानंद जोशी,श्री. रवींद्र गावडे.श्री.संतोष डिंगणकर तसेच श्री.अमोल वाघे,श्री.संतोष आंब्रे,श्री. वामन जाधव,श्री.मुलाणी साहेब.यांनीही अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक श्री.बाळासाहेब लवटे.श्री.सी.एस.पांडे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री.विकास कदम. यांचेही कौतुक आणि अभिनंदन केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.एम. वाय.पाटील व त्यांच्या सहकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.












