नांदगाव येथील देवगड निपाणी मार्ग आणि हायवे संदर्भातील समस्या आमदार नितेश राणे घेतल्या जाणून

*नांदगाव येथील देवगड निपाणी मार्ग आणि हायवे संदर्भातील समस्या आमदार नितेश राणे घेतल्या जाणून
*बांधकामाच्या अधिकाऱ्यांना केल्या आवशक त्या सूचना*

कणकवली;
मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथील जनतेच्या समस्या आमदार नितेश राणे यांनी जाणून घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.देवगड निपाणी राज्य महामार्ग आणि महामार्ग यासंदर्भात जनतेच्या मागण्या आणि त्या ठिकाणच्या वस्तुस्थिती आमदार नितेश राणे यांनी पाहणी करून जाणून घेतली.महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आधिकऱ्यांना यावेळी महत्वाच्या सूचना दिल्या.
नांदगांव येथील विविध समस्यांबाबत नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता यांच्याजवळ निवेदन सादर केले होते. नांदगाव हायवे ते फोंडाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा गटारे बांधून मिळवीत जेणेकरून पावसाच्या पाण्याची होणारी समस्या दूर होईल , देवगड निपाणी हायवे वरती देवगडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे, फोंड्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील दोन स्पीड बेकर आहेत तिथं एक बसविणे, देवगड निपाणी रोडवरील नांदगाव तिठा परिसरातील हायवेवरील रस्त्याची हद्द निश्चित करून अतिक्रमण हटविणे, देवगड निपाणी हायवे वरील धोकादाय झाडे तोडून भविष्यात होणारे अपघात टाळावे अशा विविध समस्यांसाठी नांदगाव सरपंच यांनी निवेदन सादर केले होते. या अनुषंगाने आज आमदार नितेश राणे यांनी नांदगाव येथे प्रत्यक्ष पाहणी केली .

यावेळी भाजपचे मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, रज्जाक बटवाले, माजी उपसरपंच निरज मोरये , कमलेश पाटील, प्रमोद पाटील, मारुती मोरये, यासीर मास्के आदी बहुसंख्येने ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.