VENGURLE: प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वेंगुर्ले तील वास्तूचे २१ मे रोजी उद्घाटन…

Inauguration of Prajapita Brahmakumari Iswariya Vishwa Vidyalaya in Vengurle on 21st May…

माऊंट आबू येथील बह्माकुमार सूरज भाई यांची असणार प्रमुख उपस्थिती

वेंगुर्ले | प्रतिनिधी : आध्यात्मिक ज्ञान व राजयोगाची वाहती गंगा असलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाची वेंगुर्ले माणिकचौक येथे साकार झालेली वास्तू “सुख शांती भवन” या वास्तूचा उद्घाटन समारंभ रविवार दि. २१ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता वरिष्ठ राजयोग शिक्षक, समाधान टी. व्ही. कार्यक्रम फेम, माऊंट आबू, राजस्थान येथील राजयोगी तपस्वीमूर्त आदरणीय बह्माकुमार सूरज भाई यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे.

वेंगुर्ले माणिक चौक येथील उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर मार्गदर्शन कार्यक्रम संध्याकाळी ५ वाजे पर्यंत मधुसूदन कालेलकर नाट्यगृह, कॅम्प-वेंगुर्ला येथे होणार आहे. ब्रह्माकुमारीज दैवी परिवार, वेंगुर्ला आयोजित या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राजयोगीनी बह्माकुमारी सुनंदा दीदी, राजयोगीनी बह्माकुमारी शोभा दीदी, क्षेत्रीय संचालिका मीरा सोसायटी ब्रह्माकुमारीज गोवा-सिंधुदुर्ग प्रमुख तसेच भाजप आमदार नितेश राणे, वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, समाजसेवक व उद्योजक दादासाहेब परुळकर, पुष्कराज कोले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन ब्रह्माकुमारी परिवारा तर्फे करण्यात आले आहे.