जि . प. भरती प्रक्रियेत दोन लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या श्रीकांत चव्हाण ला न्यायालयीन कोठडी.

जि . प. भरती प्रक्रियेत दोन लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या श्रीकांत चव्हाण ला न्यायालयीन कोठडी. 12 ऑगस्टला पुढील सुनावणी

सिंधुनगरी प्रतिनिधी

जिल्हा परिषद करमचारी भरतीमद्ये नोकरीला लावतो असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी श्रीकांत नारायण चव्हाण रा. आवळेगाव ता.कुडाळ याने दोन लाख रुपये घेऊन तयारीची फसवणूक केल्या प्रकरणात ओरोस पोलीस ठाण्यात फिरण्यात दाखल होती. हे पैसे आपण 30 ऑगस्ट 2022 पर्यंत येतो असे कबूल काय करू नये त्याने ते पैसे दिले नाहीत या कारणास्तव या संशयित आरोपीला सिंधुदुर्ग चे अतिरिक्त चे मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सावंतवाडी कारागृहात रवानगी केली असून याप्रकरणी पुढील सुनावणी 12 ऑगस्ट 2023 रोजी ठेवली आहे.

फिर्यादी यांच्याकडून जिल्हा परिषद मध्ये लिपिक पदावर आपल्याला नोकरीला लावतो असे सांगून त्यांच्याकडून चार लाख रुपयाची मागणी केली होती व प्रथम त्यांनी दोन लाख रुपये त्यांच्याकडून घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे घेतलेले दोन लाख रुपये देणेस टाळाटाळ करत होता व दि. 30/08/2022 रोजी पर्यंत देतो असे सांगून सुद्धा अद्याप पर्यंत त्यांची रक्कम परत केलेली नाही त्यामुळे मा. अति. मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग ओरोस यांनी सदर आरोपीची जिल्हा कारागृह सावंतवाडी येथे रवानगी केली असून पुढील सुनावणी 12/08/2023 रोजी ठेवण्यात आली आहे. अशी माहिती ओरोस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांनी दिली आहे.