कणकवली वागदे उभादेव नजिक अपघात ; पती पत्नी गंभीर जखमी

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

कणकवली | मयुर ठाकूर : तालुक्यातील वागदे उभादेव नजिक हायवे लेनचे अपूर्ण असलेल्या कामामुळे त्याठिकाणी नेहेमीच वारंवार अपघात होत असतात. आज सकाळी ९ :३० वाजण्याच्या सुमारास वागदे उभादेव नजिक एक दुचाकीला अपघात झाला. यात कुडाळ येथून कणकवली च्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला अपघात झाला. यात दुचाकी चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविले आहे.

मात्र या नेहेमीच गणेशोत्सव कालावधीत जीवघेण्या ठरणाऱ्या खड्ड्यांना वाली कोण ? असा संतप्त सवाल येथील नागरिक करत आहेत. त्यामुळे डोळेझाक करणारे अधिकारी ठेकेदार हे अपुरे काम करतील की केवळ मलमपट्टी करणार ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.