राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील ओणी परिसर ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्थेची सन २०२२-२३ ची सत्तावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ठिक १० वा. गजानन मंगल कार्यालय, ओणी येथे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गजानन पाध्ये यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी मागील सभा दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. दि. ३१ मार्च २०२३ अखेरचा नफा-तोटा पत्रक, ताळेबंद यांची नोंद घेणे. ३१ मार्च २०२३ अखेरचा वैधानिक लेखा परिक्षण अहवालाची नोंद घेणे. सन २०२३-२४ सालाकरिता संचालक मंडळाने मंजुर केलेल्या अंदाज पत्रकास मान्यता देणे. संचालकांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची माहिती घेणे. सन २०२३-२४ या वर्षाचे लेखा परिक्षण करण्यासाठी लेखा परिक्षकाची नेमणुक करणेबाबत. सभासदांकडून आलेल्या लेखी स्वरूपातील सूचना वाचून नोंद घेणेबाबत. संस्थेसाठी आर.सी.सी. बांधकाम असलेली जागा घेणेबाबत विचार करणे आदी विविध विषयावर चर्चा होणार आहे.
यावेळी पतसंस्थेच्या सभासदांनी उपस्थीत रहावे असे आवाहन व्यवस्थापक जयप्रकाश गोपाळ कुळकर्णी यांनी केले आहे.










