रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या अध्यक्षपदी रोट. पल्लवी भोगटे यांची निवड..

वेंगुर्ले : प्रतिनिधी : वेंगुर्ला रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउनचा पदग्रहण सोहळा पदग्रहण अधिकारी असिस्टंट गव्हर्नर रोटेरीयन सचिन गावडे सर यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ला येथे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी सिंधुदुर्ग झोनच्या झेड. आर. आर. पदी रोट. प्रितीश लाड, तर रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या अध्यक्षपदी रोट. पल्लवी भोगटे, सचिवपदी रोट. निकिता निनावे यांची नियुक्ती करण्यात आली. या सोहळ्यावेळी डी. सी. सी. रोटेरीयन राजेश घाटवळ सर, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउनचे अध्यक्ष रोटेरीयन शंकर उर्फ राजू वजराटकर सर तसेच सावंतवाडी रोटरॅक्ट क्लबचे सभासद उपस्थित होते.