लांजा (प्रतिनिधी) कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजाच्यावतीने रविवार दि.१०सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. तालुकास्तरीय मराठी काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा डॉ. यशवंत दामोदर लिमये सभागृह, लांजा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लांजा येथे होणार आहे. स्पर्धा खुल्या गटात होणार असून स्पर्धकांना स्वरचित १६ ते २० ओळींची एक कविता सादर करता येणार आहे. कवितेच्या विषय निवडीचे स्वातंत्र्य स्पर्धकांना असले तरी कोणताही असभ्य, वादग्रस्त अथवा भावना दुखावेल असा विषय नसावा. नाव नोंदणी व सादर करायची कविता पाठविण्यासाठी https://shorturl.at/mvLXY लिंक चा वापर करावा किंवा कार्यक्रम स्थळी कवितेची एक प्रत हाती द्यावी. यशस्वी स्पर्धकांना आकर्षक पारितोषिकांसह कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनात आपली कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.
तालुकास्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकाला रुपये ७०१ व सन्मानपत्र , द्वितीय क्रमांक रु. ५०१ व सन्मानपत्र, तृतीय क्रमांक रु. ३०१ व सन्मानपत्र तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी रु. १५१ व सन्मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येतील.
तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी काव्य वाचन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोमसाप लांजा शाखेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, उपाध्यक्ष डॉ. माया तिरमारे, जिल्हा प्रतिनिधी तथा जिल्हा सचिव राजेश गोसावी यांनी आवाहन केले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सचिव अरबाज नेवरेकर 7020463136 प्रकाश हरचेकर 9764354536, विनोद बेनकर 9423297829 यांच्याशी संपर्क साधावा.










