लांजा (प्रतिनिधी) जालना येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुका मराठा संघ लांजाची विशेष सभा रविवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अजिंक्य मंगल कार्यालय, लांजा येथे आयोजित करण्यात आली आहे.
अंतरावली जिल्हा जालना या ठिकाणी मनोज जरांगे पाटील या मावळ्याने २९ ऑगस्ट पासून चालू केलेले बेमुदत आमरण उपोषण उधळून लावण्यासाठी पोलिसाच्या प्रचंड मोठा फौज फाटा घेऊन हे आंदोलन चिरडून काढण्यासाठी मराठा समाजातील महिला, लहान मुले, वयस्कर माणसे व तरुण यांच्यावर लाठी हल्ला व गोळीबार करून जगाला आंदोलनाची दिशा देणाऱ्या मराठा समाजावर हल्ला करण्यात आला. ही बाब अत्यंत खेदजनक असून मराठा समाजाला हिण वागणूक देण्याचा जो प्रकार झालेला आहे.त्याबद्दल ठोस निर्णय घेण्यासाठी लांजा मराठा समाज बांधवांची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
तरी सर्वांनी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे, सरचिटणीस विजय पाटोळे यांनी केले आहे.









