श्रावणी सोमवार निमित्त श्री देव पाटेकर मंदिरामध्ये भाविकांना खिचडी वाटप

सावंतवाडी । प्रतिनिधी : श्रावणी सोमवार निमित्त येथील राजवाडा येथील श्री देव पाटेकर मंदिरामध्ये भाविकांना खिचडी वाटप करण्यात आले. सावंतवाडी लायन्स क्लबतर्फे सावंतवाडी संस्थानचे लखमराजे भोसले व त्यांच्या पत्नी श्रद्धा राजे भोसले यांच्या हस्ते भाविकांना खिचडी वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला सावंतवाडी लायन्स क्लबचे अध्यक्ष अमेय पई, सेक्रेटरी अभिजित पनदुरकर, खजिनदार सुनील दळवी, संतोष चोडणकर, गजानन नाईक, रवींद्र स्वार, प्रकाश राऊळ, अशोक देसाई, महेश पाटील, जितेंद्र पंडित, रविकांत सावंत, सोमेश टकेकर, संदेश परब, नाथा कदम, सुनीता टकेकर, देवयानी कुमठेकर, अनिता पाटील, स्वाती पई आदी सर्व लायन सदस्य यावेळी उपस्थित होते.