रत्नागिरी | प्रतिनिधी : दादर येथील वसंतस्मृती पक्ष कार्यालय येथे रत्नागिरी जिल्ह्यातील भगवतीनगर ग्रामपंचायती मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपसरपंच श्रेया राजवाडकर, सदस्य तेजल पोमेंडकर, प्रसाद शिर्के, दीपक नेवरेकर, अमित मोहिते, पवित्रा नेवरेकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत केले. यामुळे आता भगवतीनगर ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकत राहील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशाला विकासाच्या दिशेने नेण्याचे उद्दिष्ट मनात ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी भाजपच्या “सबका साथ सबका विकास” या उपक्रमात सहभागी व्हा, असे आवाहन यावेळी केले. तसेच महाराष्ट्रामध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपाला विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करूया, अशी भावना व्यक्त केली.










