गुरुकुल विद्यामंदिर गुणदे व सद्गुरु काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे प्रशालेंमध्ये गोपाळकाला उत्साहात साजरा

खेड (प्रतिनिधी) : सरस्वती शिक्षण संस्था गुणदे, आवाशी, शेल्डी, माणी संचलित गुरुकुल विद्यामंदिर गुणदे, सदगुरु काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे व अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठान गुणदे संचलित मातोश्री अनुसया (माई) आंब्रे स्मार्ट स्कूल गुणदे प्रशालेत गोपाळला उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीकृष्णाच्या वेशभूषेतील कु. साई साळुंके याच्या हस्ते सरस्वती पूजन, सौ.राजश्री साळवी, कु. मैथीली माळी यांच्या हस्ते गणेशपूजन, गुरुपूजन व राधाकृष्ण रुपातील विद्यार्थ्यांच्या हस्ते हंडीचे पूजन करण्यात आले.

श्री. पंडीत नागरगोजे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. दहीहंडी पूजन करुन “गोविंदा रे गोपाळा” म्हणत विद्यार्थी आनंदाने नाचू लागले. कृष्ण, राधा, पेंद्या, सुदामा यांच्या रुपातील छोटी चिमुकली बालके गोपाळकाल्याची आकर्षण होती. पंढरीच्या वाळवंटामध्ये जसे विठ्ठल भक्त नाचत असतात त्याचप्रकारे प्रशालेतील बालगोपाळ प्रागंणात गोल रिंगण करुन ‘गोविंदा रे गोपाळा’ चा जयघोष आणि डोक्यावर बरसणारा मेघराजा यामुळे आनंदाने नाचत होते. कृष्णरुपी चिमुकल्याच्या हस्ते एकावर एक थर लावून हंडी फोडण्यात आली. त्यानंतर काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विक्रांत आंब्रे, उपाध्यक्ष अरविंद आंब्रे, सचिव सुभाष पवार व सर्व संचालक यांनी विद्यार्थ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सौ.जोशी मॅडम व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. विचारे मॅडम, मम्मास स्कूल, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.