शिक्षक दिनादिवशी रोटरी वेंगुर्ला ने केला दोन ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान 

वेंगुर्ले : प्रतिनिधी : शिक्षक दिनाच्या निमित्ताने, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे सेक्रेटरी योगेश नाईक यांच्या हस्ते , सिंधुदुर्गच्या क्रीडा क्षेत्रात गेली ३० वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या, वेंगुर्ला हायस्कूलचे निवृत्त क्रीडा शिक्षक श्री जयराम वायंगणकर यांचा तसेच शाळा वेंगुर्ले नं १ च्या सेवाज्येष्ठ ,कार्यतत्पर आणि अभ्यासू शिक्षिका श्रीम गायत्री बागायतकर रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या वतीने , क्रीडक्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांच्या घरी जाऊन , शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन, सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी , रोटरी असिस्टंट गव्हर्नर संजय पुनाळेकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ,, क्लब व्हाईस प्रेसिडेंट ॲड. प्रथमेश नाईक, इव्हेंट चेअरमन आनंद बोवलेकर, ट्रेझरर पंकज शिरसाट, रो. मुकुल सातार्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.