सासोलीत सर्पदंशाने अनोळखी इसमाचा मृत्यू
दोडामार्ग (प्रतिनिधी) :
सासोली हेदूस येथे लक्ष्मीकांत करमळकर यांच्या माड पोफळीच्या बागेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. सदर इसमाचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. याबाबतची खबर संजय गवस यांनी दोडामार्ग पोलीस स्थानकात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मणेरी नदीपात्रालगत सासोली हेदुस येथील बागायतदार लक्ष्मीकांत करमळकर यांच्या बागेत गुरुवारी दुपारी अज्ञात इसमाचा मृतदेह निदर्शनास आला. याबाबत संजय गवस यांनी दोडामार्ग पोलीसांना माहिती दिली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकार्यांनी सदर इसमाचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे सांगितले. दोडामार्ग पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











