केंद्र सरकारने आधार अपडेट (Aadhar Card) करण्यासाठी तीन महिने मुदत वाढ दिली आहे. आधार मधील माहिती निशुल्क अपडेट करण्यासाठी १४ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. “माय आधार” या पोर्टलवरून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. आधार प्राधिकरणाने या संदर्भात एक परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. अगोदर फक्त १४ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या सुविधेसाठी यात मुदतवाढ देण्यात आली आहे.











