श्री बांदेश्वर मंदिरात आज सायंकाळी दीपोत्सव

बांदा : प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे देवदीपावली निमित्त येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिर व परिसरात आज २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाविकांना पणत्या व तेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी दीप प्रज्वलित करून दीपोत्सव कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बांदेश्वर भूमिका देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केले आहे.