बँकेत संचालक महेश खामकर आणि लांजा तालुक्यातील सोसायटी चेअरमन कडून सत्कार

लांजा (प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांना बेस्ट चेअरमनचा पुरस्कार मिळाल्याबद्दल लांजा येथील संचालक आणि तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे चेअरमन आणि सचिव यांच्याकडून ह्रदय सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तानाजी चोरगे यांनी यांनी अध्यक्ष म्हणून अनेक ग्राहकाभिमुख योजना राबविल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. याबद्दल त्यांना बेस्ट चेअरमन चा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.याबद्दल बँकेचे विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघाचे संचालक महेश उर्फ मुन्ना खामकर तसेच माजी संचालक सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, सचिव यांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन डॉ. चोरगे यांचा सत्कार करण्यात आला .
सावर्डे पालवन येथे हा सत्काराचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी बोलताना बँकेचे संचालक महेश खामकर म्हणाले की, अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेची घोडदौड यशस्वीपणे सुरू आहे .त्यांनी राबवलेल्या विविध ग्राहकाभिमुख योजनांमुळे सर्वसामान्य जनतेला जिल्हा मध्यवर्ती बँक आज आपली बँक म्हणून जवळची वाटू लागली आहे .आणि यामुळेच अध्यक्ष डॉक्टर चोरगे यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या आजवरच्या सर्वोच्च कामगिरीचा गौरव असल्याचे महेश खामकर म्हणाले
याप्रसंगी लांजा तालुक्यातील रिंगणे सोसायटीचे चेअरमन संजय आयरे, आरगाव सोसायटीचे चेअरमन रवींद्र खामकर , खोरनिनको सोसायटीचे चेअरमन श्याम शिंदे, तळवडे चे विजय पाटोळे, निवसर सोसायटीचे अल्ताफ काझी, वाकेड सोसायटी चेअरमन ,त्याचप्रमाणे रावारी बापरे सोसायटी चेअरमन नामे, गोविळ सोसायटीचे चेअरमन सुभाष लाखण, लांजा सोसायटीचे व्हाईस चेअरमन विकास माजळकर ,भांबेड सोसायटी चेअरमन सनगर, विलवडे सोसायटीचे सचिव सुहास खामकर तसेच सुजित कोत्रे, श्री महाडिक, श्री. शिर्के ,लांजा सोसायटीचे सचिव मधुकर कांबळे, खानवलीचे धामणे, बँकेचे तालुका क्षेत्रिय अधिकारी श्री. पवार, प्रकाश जाधव हे उपस्थित होते.











