रविवार १० सप्टेंबर पासून होणार बाजाराची सुरवात
कणकवली :ग्रामपंचायत जानवली च्या वतीने गावातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी गावठी भाज्यांच्या आठवडा बाजार रविवार १० सप्टेंबर पासून सुरू केला जाणार आहे. दर रविवारी गावठी आठवडा बाजार ग्रामपंचायत कार्यालय जानवली येथे सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० पर्यंत सुरू राहणार आहे.
या ठिकाणी गावातील महिलांनी तसेच बचतगटांनी तयार केलेली उत्पादने, रानभाज्या व इतर साहित्य उपलब्ध होणार आहेत. सदर उपक्रमाचा लाभ गावातील गरजू महिलांना होणार असून लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच जानवली यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने केले. कोरोणा काळाच्या पूर्वी जाणवली ग्रामपंचायत ने असा उपक्रम सुरू केला होता. आता नव्या जागेत हा गावठी आठवडा बाजार भरणार आहे.











