माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेत सध्या भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे.माखजन बाजारपेठेत आजूबाजूच्या गावातून ग्राहक मोठ्या प्रमाणात येत असतात.हे कुत्रे अनेकदा माणसांच्या अंगावर गुरगूरत जात असल्याने अनेक जण भीतीच्या छायेत वावरत आहेत.
बाजारातून शाळकरी,व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी देखील ये जा करित असतात.यांना ही या भटक्या कुत्र्यांचा धोका आहे.अनेक वेळा रस्त्यावर हे भटके कुत्रे एकवटले कि जायचं कुठून असा पादचाऱ्यांना प्रश्न् पडतो.या भटक्या कुत्र्यांचा संबंधित शासकीय खात्याने वनवास दूर करावा अशी मागणी होत आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माखजन बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी होते यावेळी हे कुत्रे कुणाला डसल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.ह्या विषयाकडे गांभीर्याने घेऊन भटक्या कुत्र्यांचा प्रतिबंध करावा अशी मागणी केली जात आहे.











