राज्यस्तरिय “जागर साहित्य संमेलन २०२३” चिपळूण मध्ये संपन्न

आबलोली :माय मराठीची सेवा करण्यासाठी यंदा दशकपुर्ती साजरी करत असणाऱ्या पसायदान प्रतिष्ठान, गुहागर आणि वर्षपर्ती साजरी करत असणाऱ्या सह्याद्री समाचार न्यूज चॅनेल आणि कोकण मराठी साहित्य परिषद, गुहागर आयोजित जागर साहित्य संमेलन २०२३ स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह,नगरपरिषदेजवळ चिपळूण येथे उत्साहात संपन्न झाले. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक संपादक मनोहर सोनवणे (ज्येष्ठ साहित्यिक व संपादक, पुणे)यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटनपर मनोगतात त्यांनी आजचा काळ हा प्रचंड बदलाचा आहे इंग्रजीचे मराठीवर आक्रमण होत आहे.पुर्वी इंग्रजी नाही आले तरी चालत होते परंतु आज मराठी नाही आली तरी चालते अशी स्थिती आहे वाचक खूप कमी झालेत साहित्यिकांना आपण मराठीच्या सेवेसाठी लिहीत आहे असं वाटावं तर नवी पिढी ही नव्या माध्यमांमध्ये गुंग आहे.ही खुप चिंतेची बाब आहे मराठीचा प्रचार आणि प्रसार वाढला पाहिजे.मराठी माणसाने मराठीची पालखी खांद्यावर घेतली पाहिजे.तर संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय साहित्यिक भास्कर हांडे (ज्येष्ठ साहित्यिक, हॉलंड, हेग पुणे)यांनी आपल्या अध्यक्षिय मनोगतात भाषा आणि संस्कृती यांचा अनुबंध आहे.प्रत्येक जगण्याची रीत वेगळी असते. निसर्ग हा पहिला संस्कार माणसावर करत असतो.विशिष्ट प्रदेशाचे गुणधर्म हे जगण्यात उतरत असतात.त्याचे प्रतिबिंब साहित्यात उतरते.मराठीच्या बोलीभाषांमुळे मराठी समृद्ध झाली आहे.मराठीची बोली म्हणजे ज्ञानोबा तुकोबाची बोली आहे.”या संमेलनासाठी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार शेखर निकम

(आमदार चिपळूण संगमेश्वर विधानसभा)होते. त्यांनी पसायदान जागर साहित्य संमेलनाच्या आयोजकांचे कौतुक केले.अशा चळवळींची समाजाला गरज आहे असे उद्गार काढले.त्याबरोबरच ज्येष्ठ साहित्यिक. दि. बा. पाटील(ज्येष्ठ साहित्यिक सांगली),नमिता रमेश कीर ( केंद्रीय अध्यक्ष कोमसाप ),रिहाना बिजले, (सामाजिक कार्यकर्ते), रियाझ खेरटकर,राजेंद्रकुमार शिंदे (जेष्ठ पत्रकार),मकरंद भागवत(ज्येष्ठ पत्रकार)यांची उपस्थिती होती .विशेष अतिथी म्हणून यासीन दळवी यांची उपस्थिती होती.या संमेलनात मान्यवरांच्या हस्ते

“पिपिलिका मुक्तिधाम” लेखक: बाळासाहेब लबडे द्वितीय आवृत्ती संस्कृती प्रकाशन, पुणे

” मुंबई.. बंबई.. बॉम्बे..” द्वितीय आवृत्ती

अथर्व प्रकाशन, जळगाव

“एक कैफियत ” कवी: द्वितीय आवृत्ती शब्दवेध प्रकाशन, कल्याण अशी ही तीन पुस्तके प्रकाशित झाली.

या संमेलनात पसायदान राज्यस्तरिय काव्यपुरस्कार सोहळा संपन्न झाला.

पुरस्कार प्राप्त कवी

“घामाची ओल धरून”

सुप्रसिध्द कवी आबासाहेब पाटील ( मंगसुळी, बेळगाव )

“झाडोरा”प्रसिध्द लेखक, समीक्षक, बालसाहित्यिक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते, डॉ. श्रीकांत पाटील (कोल्हापुर, घुणकी)

“सांजात”तहसीलदार व कवी प्रताप वाघमारे (नागपूर)यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.यानंतर

पसायदान राज्यस्तरिय निमंत्रितांचे कविसंमेलन संपन्न झाले.यात

कवी संमेलनाध्यक्ष प्रभाकर साळगावकर (प्रख्यात कवी व साहित्यिक, माजलगाव, बीड)हे होते तर सूत्रसंचालन

श्री. राजेसाहेब कदम (प्रसिध्द कवी, अहमदपूर) यांनी केले.यात

सहभागी कवी श्री. धनाजी धोंडीराम घोरपडे (कवी समीक्षक सांगली) राम कळंबटे, तोंडली

सिध्दी चाळके, खेड,,स्वप्निता आंबेरकर, गुहागर,मयुरेश माने, सावर्डे,ओंकार विजय गुरव, गुहागर, विजया मेस्त्री, काजुलीं,संदीप येलये, तोंडली ,सौ. विद्या विजय गुरव, गुहागर,अक्षय काजारे,रुपाली पाटील, खेड,संजय कुळ्ये, रत्नागिरी

,प्रदीप मोहिते, ओमळी,

,संदेश सावंत, सावर्डे , सौरभ महापदी, पोसरे,अवंतिका महाडिक, चिपळूण ,हे होते .रसिकांनी या संमेलनाचा आस्वाद घेतला.शाहीर शाहिद खेरटकर

प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे,डॉ. संजय बोरुडे यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते.