सिंधुदुर्गचे अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची
पोलीस उप आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे बदली
सिंधुनगरी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांची पोलीस उप आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यानी अनेक महत्त्वाचे गुन्हे उघड करण्यात मुलाची कामगिरी बजावली आहे. तसेच जिल्ह्यातील आत्महत्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठीही पावले उचलली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांचा चांगला समन्वय राहिल्यामुळे त्यांच्या कार्यकाळात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात पोलीस दलाला यश आले होते. अनेक चोऱ्या घरपोळ्या खुनाचे गुन्हे उघडकीस आणल्यास पोलिसांनाही यश मिळाले होते. जिल्ह्यातील वाढत्या आत्महत्या बाबत नुकतेच जिल्ह्यातील काही ज्येष्ठ पत्रकारांनी बगाटे यांचे लक्ष वेधले होते. याबाबतही त्यांनी जिल्ह्यातील आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली होती व याबाबतचा एक अहवाल आहे आपण तयार करत असल्याचे सांगितले होते.










