रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर व तालुका आयोजित दहीहंडी उत्सव 2023 यंदा भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर उत्साहात पार पडला यामध्ये 23 पथकाने सलामी दिली व राजापूर दिवटेवाडी यांनी सात थराची उत्कृष्टरित्या शिस्तबद्ध अशी सलामी देऊन राष्ट्रवादीच्या 15555/- रोख रुपयाचा रक्कम व आकर्षक राष्ट्रवादी चषक पटकावले दिवटेवाडी राजापूर हे पथक राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय ओगले यांचे गोविंदा पथक यांनी हा दहीहंडीचा मान पटकावला












