
संस्कृत विषयात सुयश मिळवण्यार्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा गौरव
लांजा (प्रतिनिधी) संस्कृत ही प्राचीन भाषा असून बऱ्याच भाषांची ती जननी आहे, असे म्हटले जाते. म्हणूनच संस्कृत भाषेचा वारसा आपण जपला पाहिजे, असे प्रतिपादन संस्कृत शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा सौ. रेखा इनामदार यांनी लांजा येथे केले.
लांजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात संस्कृत दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने आज शनिवारी ९ सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.तसेच संस्कृत संयुक्त विषयामध्ये ४७ ते ५० गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा त्याचप्रमाणे ९५ ते १०० एवढे गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा गुणगौरव आयोजित करण्यात आला होता. यावेळी सौ. रेखा इनामदार या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, प्रमुख पाहुणे म्हणून न्यू इंग्लिश स्कूल लांजाचे माजी पर्यवेक्षक गजानन जगताप हे उपस्थित होते. संस्कृत शिक्षक संघटनेचे कार्यवाह श्री पाटणकर, न्यू इंग्लिश स्कूल लांज्याच्या मुख्याध्यापिका विद्या आठवले, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजु सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मान्यवरांची भाषणे झाली. या कार्यक्रमासाठी
सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक सहकार्यवाह उपस्थित होते. तसेच वेगवेगळ्या शाळातून आलेले संस्कृतचे मुख्याध्यापक, शिक्षक लांजा हायस्कूलचे उपमुख्याध्यापक जाधव, पर्यवेक्षक भैरु सोनवलकर ,ज्युनिअर विभाग प्रमुख सुनील पाटोळे त्याचप्रमाणे शिक्षक पालक संघाचे सचिव सरवळे ,सहकार्यवाह मारुलकर यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.











