रस्त्याच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून फोंडावासियांची गैरसोय दूर होणार ! आम. नितेश राणे
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : देवगड- निपाणी हा राज्य मार्ग फोंडाघाट बाजारपेठेतून जातो. या मार्गावरून वाहतुकीचे प्रमाण अतोनाण वाढल्याने,वाहतुकीचा प्रश्न त्याचप्रमाणे व्यापारउदिम, प्रदूषण इत्यादी समस्यांना, शेजारील रहिवासी आणि रुग्णांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बाजारपेठ उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.रस्ता रुंदीकरण, भूमिगत गटार आणि टिकाऊ रस्त्यांसाठी यापूर्वी अनेकदा बैठका झाल्या. त्यासाठी प्रयत्नही झाले. संघर्ष करावा लागला. त्यामुळे विशेषतः फोंडा व्यापारी आणि ग्रामस्थांनी ठेकेदाराकडून सुयोग्य आणि टिकाऊ तसेच पारदर्शक काम करून घ्यावे. ठेकेदार हा सेवक असल्याने,त्याचे कामावरही आपले काटेकोर लक्ष राहील. असे आवाहन आम.नितेश राणे यांनी करताना, देवघर धरणाचा डावा तीर कालव्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सही ताकद लावणार असून पाण्याचा ज्वलंत प्रश्नाला न्याय देणार असल्याचे सूचित केले.
देवगड- निपाणी रस्त्यासाठी एक कोटी ७७ लाख रुपये च्या कामाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून, टेंडर प्रक्रिया- वर्कऑर्डर काढण्यात आलेली आहे. पालकमंत्री आम.रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. याबद्दल व्यापारी- ग्रामस्थांमध्ये सहविचार सभा राधाकृष्ण मंदिर येथे पार पडली. यावेळी त्यांचेसह सरपंच संजना आग्रे, तनवी मोदी, मनोज रावराणे, सुजाता हळदिवे, संतोष आगरे, दिलीप पारकर, सुरेश सामंत, सुभाष सावंत, भाई भालेकर इत्यादी उपस्थित होते. यावेळी संतोष आगरे- संजना आग्रे यांनी नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर नितेश राणे यांनी नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंच यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी देवगड-निपाणी- हैदराबाद राज्य मार्ग नॅशनल मार्ग म्हणून जाहीर करावा, देवघर धरण पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे, फोंडाघाटचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये गेलेला भाग वगळावा असे, कित्येक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा अशी आग्रही मागणी भाजप जिल्हा सरचिटणीस राजन चीके यांनी यावेळी केली. भाई भालेकर यांनी आभार प्रदर्शन करून सहविचार सभेचा समारोप केला. यावेळी पेठेतील व्यापारी ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.