आदर्श शाळा वेलदुर नवानगर मराठी शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहात साजरा

गुहागर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर मराठी या शाळेत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन मोठ्या उत्साह मध्ये साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थिनी कुमारी अंत्रा तुषार पालशेतकर हिच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर दीप प्रज्वलन विद्यार्थिनी कुमारी श्रुती समीर वनकर हिच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्याध्यापक मनोज पाटील, शिक्षिका सत्वशीला जगदाळे, पल्लवी घुले अंजली मुद्दमवार व विद्यार्थी उपस्थित होते.

त्यावेळी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राज संदीप वरवटकर यांनी पटकावला द्वितीय क्रमांक दीप अशोक नाटेकर ,तृतीय क्रमांक आर्या पुंडलिक नाटेकर तर निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वेदिका राजेंद्र जाधव, द्वितीय क्रमांक स्मित उमेश नाटेकर, तृतीय क्रमांक लवेश शशिकांत नाटेकर यांनी पटकावला. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक डिजिटल व आनंददायी शाळा . वेलदूर नवानगर शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यावेळी सत्वशीला जगदाळे ,अंजली मुद्दमवार, पल्लवी घुले यांची भाषणे झाली. आपल्या मनोगत मध्ये मनोज पाटील म्हणाले की सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका ,पहिल्या विचारवंत, पहिल्या कवयित्री पहिल्या विचारवंत आहेत. त्यांच्या कार्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. शेतातील मातीचा पाटी प्रमाणे उपयोग करून झाडाच्या फांदीच्या काटकीचा लेखणीचा उपयोग करून सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा श्री गणेशा सुरू झाला. सावित्रीबाई फुले होत्या म्हणूनच स्त्रिया आज अनेक सन्मानाच्या जागेवर विराजमान झालेले आहेत.