कम्प्युटरसह सोन्याचे दागिने चोरीस
खेड | प्रतिनिधी : बंद घराचे कुलुप तीक्ष्ण हत्याराने तोडून घरातील संगणक व सोन्याचे दागिने असे १ लाख ६८ हजार ५४० रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विवेक बाबुराव यादव (वय २७ वर्ष) यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एकूण चोरीस गेलेल्या मुद्दे मालामध्ये ४०,१७० रु. किमतीचा १ एच. पी. कंपनीचा. चंदेरी रंगाचा, ८जी. बी क्षमतेची रॅम ५१२ जी. बी क्षमतेचा , विंडोज – ११ ऑपरेटिंग सिस्टिमचा, कोअर आय थ्री प्रोसेसर, ९७२६५ रु. कि.चा १० ग्रॅम प्रति ५५७०० रुपयेची, १५.१३० ग्रॅम वजनाची, २० इंच व्यासाची, एन १४ मॉडेलची, १ सोन्याची चैन, १९१०५ रु. कि.ची. ३.७२० ग्रॅम वजनाची, प्रति ग्रॅम ४४४८ रुपयांची , १ सोन्याची अंगठी असा मुद्दे माल चोरून नेला.










