फणसोप सडा येथे भरधाव वाहनाच्या धडकेत बैलाचा मृत्यू, वासरु जखमी; चालक फरार

रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी-पावस रस्त्यावरील फणसोप सडा येथे अज्ञात वाहन चालकाने बैल आणि वासराला धडक देउन पळ काढला. यात गंभिर जखमी झाल्याने बैलाचा मृत्यू झाला असून वासरु जखमी झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना बुधवार 30 जुलै रोजी सकाळी 7 वा.सुमारास घडली.
याबाबत महिला पोलिस काँस्टेबल अर्चना मगदूम यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सकाळी फणसोप सडा येथील रस्त्यावर अज्ञात भरधाव वाहनाने बैल आणि वासराला धडक देत अपघात केला. या वाहन चालकाने जखमी गुरांना कोणतीही वैद्यकिय मदत न पुरवता पळ काढल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.