दापोली l प्रतिनिधी: अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणाकडे निघाल्याने मुंबई गोवा महामार्गावर माणगाव बाजारपेठेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या मार्गावर 4 ते 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात निघालेले असताना माणगावजवळ बाजारपेठ परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. बाजारपेठ परिसरातच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. माणगाव बस स्थानकात पुणे आणि श्रीवर्धन जोड रस्ता त्याच बरोबर बाजारपेठ असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.










