गणेश चतुर्थी पार्श्वभूमीवर कणकवली पोलिसांचे नागरिकांना आवाहन 

रस्त्याच्या दुतर्फा तसेच साईड पट्टीवर लावलेल्या गाड्या सुरक्षित करण्याचे आवाहन

कणकवली : सध्या मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल झाले आहेत. तसेच नागरिकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळते. असे असताना कणकवली शहरातील सर्व्हिस रस्ते आणि नरडवे फाटा वरील दुतर्फा लावलेल्या वाहनचालकांना पोलीस व्हॅन च्या माध्यमातून अलाऊन्समेंट करत पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सूचना केल्या आहेत.

एक दोन वेळा सूचना करून वाहनचालक देखील ऐयकत नाहीत अशा वाहनांवर बैठकीत ठरल्याप्रमाणे पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण नरडवे फाटा ते गांगो मंदिर दरम्यान सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात अशाही वाहनचालकांना समज देऊन पुन्हा तीच चूक होत असल्याचे निदर्शनास येते.