उद्योजक आणि शिवसेनेचे विभाग संघटक – रवींद्र डोळस
लांजा(प्रतिनिधी ) सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजा,आणि राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई ने कोकणात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोफत चहा, बिस्कीट, दूध, पाण्याची सोय करून या दोन्ही संस्थनी खऱ्या अर्थाने सर्वधर्म समभाव जपला असल्याचे प्रतिपादन उद्योजक आणि शिवसेनेचे विभाग संघटक रवी डोळस यांनी वेरळ येथे केले.
दि. १९ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबई ,पुण्यासह चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होत आहेत. या गणेश भक्तांसाठी मोफत चहा, पाणी, दूध, बिस्किट चा उपक्रम मुस्लिम वेल्फेअर सोसायटी आणि राजापूर लांजा नागरिक संघ मुंबई यांनी वेरळ येथील श्री साई सेवा मंडळाच्या संयुक्त सहकार्याने हाती घेतला आहे .वेरळ येथील मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या श्री साई मंदिरात या उपक्रमाचा शुभारंभ रविवार १७ सप्टेंबर रोजी उद्योजक रवी डोळस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आरती संग्रहाचे वाटप करण्यात आले.यावेळी मुस्लिम वेलफेअरचे अध्यक्ष रफिक शेठ नाईक, स्वामी समर्थ आय केअर चे डॉ सुहास देसाई,युवा अध्यक्षअकीब मुजावर, साई मंदिराचे अध्यक्ष विष्णू चव्हाण, सचिव रवींद्र साळवी, मान्यवर उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्त पिंटू कुलकर्णी,ग्रामपंचायत सदस्य महेश गुंडये, मनोहर डाकवे,दिनेश पातेरे,योगेश जाधव,शशिकांत बारगोडे ,विलास चव्हाण,मधुकर पानकर ,वेरवली चे उपसरपंच शांताराम गुरव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साई मंदिरचे सचिव रवींद्र साळवी यांनी केले आणि आभार ही मानले.











