खोपीमध्ये गावठी दारू अड्ड्यावर धाड , ९४ हजाराचा मुद्देमाल जप्त,दोघांवर गुन्हा

crime daru

खेड | प्रतिनिधी : येथील पोलिसांनी गावठी दारू धंद्याच्या विरोधात आपली मोहीम तीव्र केली असून तालुक्यातील खोपी गोरेवाडी येथे सुरू असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकून सुमारे ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गावठी हातभट्टी दारू नष्ट केली ही कारवाई शनिवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

खोपी गोरेवाडी येथे गावठी दारू गावठी हातभट्टी दारूचा अड्डा सुरू असल्याची कुनकुन पोलिसांना लागली त्यांनी घटनास्थळी अचानक धाड टाकत त्या ठिकाणी असलेले गावठी हातभट्टी दारू जप्त करत दारूचे रसायन तसेच आठ सिंटेक्स टाक्या असा मुद्देमाल जागीच नष्ट करून टाकला

या प्रकरणी बाबू बाळाजी गोरे, रुपेश बाळाजी गोरे यांच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दरम्यान गावठी हातभट्टी दारू विरोधात पोलिसांनी नष्ट करण्याबाबत मोहीमाती घेतली असून यापुढेही मोहीम आणखी तीव्र होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले यामुळे गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.