भजन कलावंतांच्या भवनासाठी प्रस्ताव तयार करा : आ.नितेश राणे

भजन कलावंतांनी आपले भवन उभारण्याचा निर्णय घ्यावा यासाठी आवश्यक प्रस्ताव माझ्याकडे द्यावा मी यासाठी सर्वतो प्रयत्न परि प्रयत्न करीन  हे भवन नाविन्यपूर्ण योजनेतून उभे करू असा शब्द आमदार नितेश राणे यांनी दिला आहे

 

प्रसिद्ध भजन सम्राट चंद्रकांत कदम यांच्या स्मारकाच्या ठिकाणी सौरदीप लावण्यात आले याचा शुभारंभ आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला भजन कलावंत विजय परब यांनी यावेळी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला यावेळी भजन कलावंतांना पेन्शन मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून याप्रकरणी परिपूर्ण प्रकरणे सादर करावीत असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला

आरे फाटा देवगड येथील स्मारक सौर दिव्यांनी उजळणार आहे  समाज सेवक श्री. गणेश ज. कदम व बुवा अमित तानवडे यांचा उपक्रम !! महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त कोकण कलाभूषण सुप्रसिद्ध भजनकार चंद्रकांत कदम उर्फ गुरुदास यांनी लोककलेतील डबलबारी भजनाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यांच्या स्मृतिंचे कायम स्वरूपी जतन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भरातील त्यांचे शिष्य तसेच गुरुदास परिवारातील सदस्यानी आरे फाटा येथे त्यांचे स्मारक उभारले आहे. आत्ता या स्मारकाला ओसरगाव कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र समाजसेवक गणेश जगन्नाथ कदम व बुवा अमित तानवडे यांच्या सौजन्याने तसेच बुवा गोपीनाथ बागवे, बुवा भगवान लोकरे, बुवा रामदास कासले, बुवा श्रीधर मुणगेकर, बुवा विजय परब, बुवा लक्ष्मण गुरव, बुवा भालचंद्र केळुसकर, बुवा प्रमोद हर्याण, बुवा गणेश पांचाळ, बुवा प्रमोद धुरी, बुवा प्रकाश पारकर, बुवा संतोष कानडे यांच्या सहयोगाने या स्मारकाला विविध प्रकारच्या दहा सौर ऊर्जेवर प्रकाशमान होणारे सौर दीप लाऊन रात्रीच्या वेळी हे स्मारक प्रकाशमान करण्यात येणार आहे.

याचा शुभारंभ नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम गणेश जगन्नाथ कदम,बुवा भगवान लोकरे,बुवा अमित तानवडे उपस्थित होते