रत्नागिरी | प्रतिनिधी : पतीशी सातत्याने होत असलेल्या वादाला कंटाळून पत्नीने माहेरच्यांना हाताशी धरुन पतीला मारहाण केली. ही घटना सोमवारी 18 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली.याबाबत शहर पोलिस ठाण्यात पत्नीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नी संजना शिर्सेकर, तिची मावशी सुनंदा सुर्वे, तिचा पती रमाकांत सुर्वे व स्वप्नील रमाकांत सुर्वे (रा. शांतीनगर, नाचणे रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत.त्यांच्या विरोधात श्रीकृष्ण देवीदास शिर्सेकर (42, रा. नाचणे शांतीनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.त्यानुसार श्रीकृष्ण व त्यांची पत्नी संजना यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होता. या वादातून पत्नी संजना ही मावशी सुनंदा हिच्याकडे राहत होती. 17 सप्टेंबरला ला पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. याचा राग येऊन संजना मावशीकडे रहायला गेली. मुलीला ताप येत असल्याचे पती श्रीकृष्ण यांनी पत्नी संजनाला कळविले होते. त्यानुसार पत्नी संजना ही मावशी सुनंदा तिचा पती रमाकांत यांना घेऊन श्रीकृष्ण यांच्या घरी आली व मुलीला घेऊन जाऊ लागली. त्यावेळी पुन्हा पती-पत्नीमध्ये भांडण झाले. यावेळी पत्नी संजना आणि मावशी सुनंदा यांनी श्रीकृष्ण यांची मान धरली व हाताच्या थापटाने आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच संजना हिने मावस भाऊ स्वप्नील सुर्वे याला फोन करुन बोलावून घेतले व चौघांनी श्रीकृष्ण शिर्सेकर यांना बेदम मारहाण केली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.











