केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या विमानाचं इमरजेंसी लॅडींग करण्यात आले आहे. कमी दृश्यमानतेमुळं बुधवारी रात्री इमरजेंसी लॅडींग करण्यात आले आहे. अमित शहा यांचं विमान गुवाहाटी च्या गोपीनाथ बोरदोलोई अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवलं गेलं.संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमित शहा आगरतळाला जाणार होते, पण दाट धुक्यामुळे विमान आगरतळा विमानतळावर उतरू शकले नाही. यामुळे विमान गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.अमित शाह आज त्रिपुरात भाजपच्या रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. आठ दिवस चालणाऱ्या या यात्रेला त्या दिवशी उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील धर्मनगर येथून सुरुवात होणार आहे.