रत्नागिरी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी संजय निवळकर यांची निवड

 

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा कार्यकारणीनंतर आता तालुका आणि वेगवेगळ्या आघाड्या, प्रकोस्ट, सेल, मोर्चा यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची यादी आज रोजी भाजप पक्षा कडून जाहीर झाल्या असून रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्या जाहीर केल्या आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील रहिवासी संजय निवळकर यांची अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री निवळकर हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांची स्वराज प्रतिष्ठान नावाची संस्था असून ते स्वतः संस्थापक व अध्यक्ष असून त्या संस्थे द्वारे त्यानी ॲम्बुलन्स सेवा, रक्तदान शिबिरे, मोफत ऑपरेशन, नेत्र तपासणी, कॅन्सर ग्रस्तांना मदत, अपघात ग्रस्तांना मदत, पूर परिस्थितीत लोकांना मदत, कोरोना महामारी मधे विविध प्रकारची मदत व मोफत ॲम्बुलन्स सेवा दिलेली आहे.

तसेच राजकीय क्षेत्रात त्यांनी शाखा अध्यक्ष, विभाग प्रमुख, तालुका उपाध्यक्ष पद भूषविलेले असून सद्यस्थितीत निवळी ग्रामपंचायत उपसरपंच पदाची धुरा सांभाळत आहेत. तसेच राजकीय क्षेत्रात काम करीत असताना शासनाच्या विविध योजना, प्रकल्प याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोचविणे, रस्ते, गटारे, संरक्षण भिंत, ब्रिज, स्मशानभूमी, घरकुल, शाळा, गुरांचे गोठे, निवारा शेड, सभागृह अशी जनतेची अनेक कामे शासनाच्या माध्यमातून करून दिली आहेत. सहकारी पत पेढीत ते स्वतः संचालक असून त्यांनी सहकार क्षेत्रात सुधा आपले कामाचा ठसा उमटवला आहे.

तसेच संजय निवळकर हे भारतीय चर्मकार समाज मुंबई, महाराष्ट्र या संघटनेचे रत्नागिरी जिल्हयाचे अध्यक्ष असून त्यांनी त्यांचे समाजाचे विविध कार्यक्रम आयोजित करून समाज बांधवांना वेळोवेळी सहकार्य केलेले आहे. संजय निवळकर यांचे कामाचा वाढता आलेख पाहून त्यांच्या कामाची दखल घेऊनच आज भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष पदाची नियुक्ती करून आणखी एक महत्त्वाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. त्यामुळे त्यांचे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा व त्यांचे समाज बांधवांकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

भारतीय जनता पक्षाने आज पर्यंत सोपविलेल्या सर्व जबाबदाऱ्या व कामगिरी, व समाजाप्रती असलेली बांधिलकीची जाणिव ठेऊन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत क्रियाशील राहून मी नेहमीच सर्व जबाबदाऱ्या योग्य त्या रीतीने पार पाडलेल्या असून कोणतेही पद हे छोटे मोठे नसून त्या पदाला आपण साजेसे, व यशस्वी पूर्वक न्याय देतो का हे महत्वाचे आहे. इथून पुढे पुन्हा एकदा मोठ्या जोमाने काम करू. आता यानंतर देखील पक्षानी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व यशस्वीपणे पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे संजय निवळकर यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले. व भारतीय जनता पक्षाचे तसेच रत्नागिरी जिल्हाध्यक्ष यांचे आभार मानले.