गोळप येथील दोन दुचाकी अपघातात वृद्धाच्या मृत्यूला कारणीभूत चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी ः प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वी गोळप येथे बेदरकारपणे दुचाकी चालवून पुढील दुचाकीला धडक देत अपघात करुन त्यावर पाठीमागे बसलेल्या वृध्दाच्या मृत्यूस कारणीभ्ाूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना गुरुवार 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वा.घडली होती.

सिध्देश दिपक गुरव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.तर या अपघातात नारायण वासुदेव चिपळूणकर यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.गुरुवारी दुपारी सिध्देश आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एडब्ल्यू-0703) घेउन जात होता.त्याच सुमारास प्रसाद मुरकर आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एएच-5122) वर नारायण चिपळूणकर यांना पाठीमागे बसवून जात असताना सिध्देशने बेदरकारपणे दुचाकी चालवून त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक देत अपघात केला होता.यात गंभिर जखमी झालेल्या चिपळणूकर यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.या अपघात प्रकरणी आता सिध्देश विरोधात भादंवि कायदा कलम 304(अ),279,337,338,मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.