रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील वाडाजून येथील आंबा बागेत कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला.ही घटना शुक्रवार 22 सप्टेंबर रोजी घडली असून याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आनंद विनोद बोळे असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.याबाबत खबर देणारे हे शुक्रवारी सकाळी आनंद बोळला पाहणयासाठी गेले होते.परंतू आनंद आपल्या रुमचा दरवाजा उघडत नसल्याने खबर देणार यांनी आपल्या ओळखीचे सुभाष भुवड,अतुल कुर्टे,अरुण धुमक (सर्व रा.वाडाजून,रत्नागिरी) यांना बोलावून घेतले.या सर्वांनी रुमचा दरवाजा ढकलून उघडला असता त्यांना आनंद बोळे निपचिप पडलेले दिसून आले.ते काहीच बोलत नसल्याने त्यांना तातडीने प्रथम परकार हॉस्पिटल येथे नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी आनंद बोळे यांना तपासून मृत घोषित केले.










