मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची माहिती
सावंतवाडी रुग्णालयात कर्मचार्यांची आरोग्य तपासणी
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगर पालिकेच्या स्वच्छता विभागात काम करणार्या कर्मचार्यांना आरोग्य सुविधा देण्याबरोबर त्यांचा विमा काढण्यात येणार आहे. तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी आज येथे दिली.
सावंतवाडी पालिका आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून स्वच्छता विभागात काम करणार्या सुरक्षा रक्षकांची आज येथील कुटीर रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपस्थित चाळीसहून अधिक कर्मचार्यांची यावेळी इसीजी, एचआयव्ही, सीबीसी तपासणी करण्यात आली.
यावेळी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे, डॉ. सागर जाधव, चिन्मय पिशवीकर, डॉ. अंबापुरकर आदी उपस्थित होते. यावेळी पालिकेेच्या स्वच्छता पर्यवेक्षक रसिका नाडकर्णी, स्वच्छता निरिक्षक पांडुरंग नाटेकर, अक्षय पंडित, निवेद कांबळे, शिवराम तवटे, सफाई कर्मचारी समिर कदम, विनोद काष्टे, मिलिंद तांबे, गौरेश वासकर, राजन जाधव, विजय कोटेकर, सतिश सांगलेकर, जयवंत जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.












