सावंतवाडी रेल्वे स्थानकातील विविध प्रश्नांचा संदर्भात मनसेची स्टेशनमास्तरांशी चर्चा

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकण रेल्वेच्या सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानकातील विविध प्रश्नासंदर्भात तसेच प्रवाश्यांना होणाऱ्या गैरसोयी वं तक्रारीबाबत सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी मळगाव रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर सौ. गांवकर यांचीं भेट घेत चर्चा केली. कोकण रेल्वेच्या मळगाव रेल्वे स्थानकावर सुविधाची गैरसोय असून प्रवाश्याना याचा त्रास सहन करावा लागत आहे. आरक्षण खिडकी, तिकीट बुकिंग बाबत प्रवाश्याना ताटकळत राहावे लागत असून त्याबाबत मनसे माजी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी लक्ष वेधले. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर जलदगतीच्या गाडयांना थांबा मिळावा प्रवाश्याना वेळेचा होणारा भुर्दंड थांबवा यासाठी प्रयत्न करण्याची मागणी मनसे कडून करण्यात आली.

कोकण रेल्वेतं प्रवास करणाऱ्या प्रवाश्याचा टीसी कडून मोबाईल काढून घेतला जाण्याचे प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता त्याबाबत यावेळी पदाधिकारी यांनी लक्ष वेधले. यावेळी प्रवाश्याना होणाऱ्या त्रासांबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. मळगाव रेल्वे स्थानकातील सुविधा पूर्ववत केली जाईल. टीसी सदर्भात प्रवाश्याना झालेल्या त्रासाची दखल घेतली जाणार असून त्याबाबत वरिष्ठाशी चर्चा करून कारवाई करण्याचे आश्वासन स्टेशन मास्तर सौ गावकर यांनी दिले.यावेळी मनसे पदाधिकारी राजू कसकर यांनी मळगाव रेल्वे स्थानकावर जलद गतीच्या गाडयांना थांबा मिळावा अशी मागणी यावेळी केली त्याबाबत आवश्यक तो पाठपुरावा वरिष्ठ स्थरावर करण्याचे आश्वासन सौ गावकर यांनी दिले.माजी शहरअध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाअध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन जिल्हाअध्यक्ष राजू कासकर म.न.वि.से उपजिल्हाअध्यक्ष कौस्तुभ नाईक आरोस माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक प्रमोद तावडे प्रणित तळकर साहिल नाईक आदी उपस्थित होते.