गांधी प्रतिष्ठान आयोजित निबंध व वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहिर

गांधी जयंती दिनी पारितोषिक व प्रमाणपत्रे वितरण

चिपळूण (प्रतिनिधी) : गांधी विचारांचा प्रसार व प्रचार करणाऱ्या येथील पूज्य गांधी प्रतिष्ठान आयोजित निबंध व वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहिर झाला असून २ आँक्टोबर या गांधी जयंती दिनी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. या समारंभाला आ. शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, चिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत यादव, जयंद्रथ खताते राज्य उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, राजेंद्र बहाळकर नामवंत सामाजिक कार्यकर्ते पुणे, आकाश लिगाडे उपविभागीय अधिकारी चिपळूण, राजेंद्रकुमार राजमाने उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण, प्रसाद शिंगटे मुख्याधिकारी चिपळूण नगरपरिषद आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे.

सोमवार दि. २ आँक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता गांधारेश्वर, गांधीघाट येथे महात्माजींच्या समाधी समोर होणाऱ्या कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या सभासदांनी व गांधीप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे- निबंध स्पर्धा प्राथमिक गट- प्रथम ईशल इम्रान कोंडकरी, ख्रिस्त ज्योती, द्वितीय मृष्मयी प्रसाद जोग न्यू.इं. स्कूल सती, तृतीय अमेय रामचंद्र नांदिवडेकर, गोविंदराव निकम विद्यालय सावर्डे, उत्तेजनार्थ जोया इलियास अत्तार, एस,पी एम. व अमल अल्ताफ खान, नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल. माध्यमिक गट- प्रथम क्र.ओंकार शंकर शिंदे, ख्रिस्त ज्योती, द्वितीय क्र. अनुप नारायण पाटील गो.नि. विद्यालय सावर्डे, तृतीय क्र. उमामा सईद खतिब नॅशनल स्कूल मिरजोळी, उत्तेजनार्थ अनघा तानाजी कांबळे इं. मि. स्कूल सावर्डे, समृद्धी किरण शिर्के न्यू. इं. स्कूल सती, आयशा अ. रहिमान खोत हाजी आमीन दाऊद अमीन कालुस्ता. कनिष्ठ महाविद्यालय गट- प्रथम क्र. तेजल प्रशांत पवार आर. सी. काळे, द्वितीय क्र. निदारब्बी फरहान हुसैन, दलवाई ज्यू. काँलेज कालुस्ता, तृतीय क्र, भक्ती विश्वनाथ महाडिक डी. बी. जे. काँलेज, उत्तेजनार्थ पृथा प्रमोद पवार गो.नि. महाविद्यालय सावर्डे व तन्वी अशोक आग्रे न्यू. इं. स्कूल सती. वरिष्ठ महाविद्यालय व खुला गट- प्रथम क्र. बाबासाहेब राजाराम लाड उभळे, डॉ. यास्मीन इलियास अत्तार काविळतळी, तृतीय क्र. सौ. दिशा दिपक विचारे सावर्डे, उत्तेजनार्थ सचिन अशोक पोकळे सावर्डे व प्रा. विक्रांत एकनाथ निवाते खेंड.

वक्तृत्व स्पर्धा- प्राथमिक गट- प्रथम क्र. भार्गवी कानडे आर.सी. काळे हायस्कूल, द्वितीय क्र. मृण्मयी प्रसाद जोग सती हायस्कूल, तृतीय क्र. मिहीर विजयानंद भुवड दलवाई हायस्कूल, उत्तेजनार्थ सफ्फान दलवाई नॅशनल मिरजोळी व अलिना आंबेडकर महाराष्ट्र हायस्कूल. माध्यमिक गट- प्रथम क्र. रिया संजय खरात दाभोळकर इं. मि. स्कूल सती, द्वितीय (विभागून) लईबा खतिब नँशनल व समृद्धी कुळे दलवाई हायस्कूल, तृतीय क्र, ताहिर लालू नॅशनल इं. मि. स्कूल, उत्तेजनार्थ मारिया आंबेडकर महाराष्ट्र हायस्कूल व अवंती संजय उचले सती हायस्कूल, कनिष्ठ विद्यालय गट… प्रथम क्र. स्नेहा संतोष शिंदे सती हायस्कूल, द्वितीय मुस्कान मेमन नँशनल इं. मि. स्कूल, तृतीय क्र. अझिझा अदिल सूर्वे कालुस्ता, उत्तेजनार्थ अनुष्का अरुण संकपाळ सती व सेजल गजानन पवार सती, वरिष्ठ महाविद्यालय व खुला गट- प्रथम क्र. सिध्दी संतोष चाळके डी.बी.जे. कॉलेज, फिजा जलील खतिब कालुस्ता, तृतीय क्र. पूर्वा चंद्रशेखर सावले, स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. गिरीराज पांडे, प्रा. विनायक बांद्रे, महमंद हुसैन मूसा, शरयू इंदुलकर, प्रा. विठ्ठल कोकणी, सौ. मानसी टाकळे, श्रीमती सिमा साडविलकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी, शिक्षक, पालक व शिक्षण संस्था संचालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्या सर्वांचे प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानण्यात आले असून कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.