भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिवपदी अनिलकुमार करंगुटकर यांची निवड

राजापूर (प्रतिनिधी): भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व राजापूर अर्बन बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंन्टचे अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर यांची भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश ओबीसी संघटनेच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
भाजपाच्या प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष संजय गाते यांनी भाजपाच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीची घोषणा केली असून त्यामध्ये कोकण विभागातुन राजापूर तालुक्यातील अनिलकुमार करंगुटकर यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे.करंगुटकर हे भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून त्यांनी संघटनेत विविध पदावर काम केले आहे. भाजपाचे राजापूर तालुका अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे. तर जिल्हा सहकार सेलचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. त्यांची भाजपा प्रदेश ओबीसी संघटनेच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.