खेड : येथील सामाजिक कार्यकर्ते अनस पोत्रिक यांचे वडील युसुफ अब्दुल गणी पोत्रिक यांचे वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन.
युसुफ अब्दुल गणी पोत्रिक हे खेड येथील सामाजिक कार्यकर्ते अनस पोत्रिक यांचे वडील तसेच सामाजिक कार्यकर्ते व अखिल भारतीय गोवा स्वतंत्रता सैनिक संघाचे राष्ट्रीय संघटक मेहबूब मोहीमतूले यांचे सासरे होते. समाजातील अनेक गोर गरीब जनतेला, पीडितांना ते वेळोवेळी मदतीचा हात देत असत.त्यांच्या जाण्याने खेड मधील एक दानशूर व्यक्तिमत्व हरवले आहे. ते पोत्रिक घराण्यातील जेष्ठ होते, त्यांच्या पश्च्यात 3 मुले, 2 मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या दफनविधि त्याप्रसंगी सर्व समाजातील लोकांनी उपस्थित राहून अंतिम दर्शन घेतले व श्रद्धांजली अर्पण केली.













