भाजपच्या ‘अब की बार ४००+ सरकार’ अभियांनंतर्गत चिपळूण-संगमेश्वर मधील १२५ प्रमुख कार्यकर्त्यांची निवड

bjp
29 सप्टेंबरला संगमेश्वर येथे बैठक

रत्नागिरी | प्रतिनिधी : 

भाजपच्या ‘अब की बार ४००+ सरकार’ अभियांनंतर्गत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार ‘महाविजय २०२४ बूथ सशक्तीकरण अभियान रत्नागिरी जिल्ह्यातही जिल्हा भाजपातर्फे मोठ्या प्रमाणात राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रातील १२५ प्रमुख कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे.

 

संगमेश्वर तालुक्यातील यातील सर्व कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी देवरूख येथील श्री नृसिंह मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चिपळूण तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक रविवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता भाजपच्या चिपळूण कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा प्रभारी प्रमोद जठार, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, चिपळूण – संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद अधटराव हे मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. नियुक्ती झालेले प्रमुख कार्यकर्ते, संगमेश्वरचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के आणि रूपेश कदम तसेच जिल्हा कार्यकारिणीचे तालुक्यातील नूतन पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.