किरणजी सामंत यांनी कमळ चिन्हाचा लोगो स्टेटसला लावला असता तर आनंदच झाला असता!

दीपक केसरकर ताकदवर नेते, त्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला तर पक्ष आणखी मजबूत होईल! – आमदार नितेश राणे.

 सिंधुनगरी : बाळ खडककर :मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यानी व्हाट्सअप ला कोणता स्टेटस लावावा हा त्यांचा प्रश्न आहे. आपण एक भाजपचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून पक्षाची भूमिका मांडणे, पक्षाची बाजू घेणे, महायुतीची बाजू घेणे ही माझी जबाबदारी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ताकद देण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग चा एन डी ए चा खासदार निवडून आणण्याची जबाबदारी आम्हा सर्वांचीच आहे. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मदत करण्याचे कृत्य होऊ नये ही अपेक्षा आहे. जर किरण सावंत यांनी कमळ चिन्हाचा स्टेटस लावला असता तर आपल्याला आनंद झाला असता व त्यांचे आपण अभिनंदनही केले असते अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सिंधुनगरी येथील पत्रकार परिषदेत दिली.

किरण सामंत यांनी मशाल चिन्हाचा लोगो व्हाट्सअप स्टेटस ला लावला दोन तासांनी तो काढला पत्रकारांनी आमदार नितेश राणेंना विचारले असता ते म्हणाले किरणजी सामंत ने कोणता स्टेटस लावावा कोणत्या राजकीय पक्ष स्वीकारावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर मी भाष्य करणे उचित नाही. त्याने काय करावे हाही प्रश्न त्यांच्या आहे. मात्र जर त्यानी कमळ चिन्हाचा लोगो लावला असता तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला आनंद झाला असता व मी सुखावलो असतो. महायुतीचे नुकसान होऊ नये तसे काम करू नये अशा सूचना पक्षश्रेष्ठींकडून आहेत त्यामुळे हा संदेश ही आहे किरणजी समानतांकडे लवकरच पोहोचेल असेही नितेश राणे म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांवर येत असलेल्या दबाव तंत्राला कंटाळून आपण भाजपमध्ये गेलो असतो तर बरे होते असे विधान शिंदे शिवसेना गटाचे नेते दीपक भाई केसरकर यांनी नुकतेच व्यक्त केले होते याबाबत पत्रकार आणि आमदार नितेश राणे यांना विचारले असता ते म्हणाले ‘ दीपक केसरकर भाजपात आले तर निश्चितच त्यांचे स्वागत होईल’. मजबूत लोकांना भाजपमध्ये स्थान दिले तर पक्ष आणखी मजबूत होईल. जे जे ताकतीचे लोक आहेत त्यांना भाजपमध्ये घेण्याचे व हा पक्ष आणखी मजबूत करण्याचे धोरण आहे. दीपक केसरकर हे तीन वेळा आमदार झाले आहे सध्या कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे ते ताकदवर नेते आहेत. त्यानी पक्षाचे सदस्य स्वीकारले तर नक्कीच त्यांचे स्वागत होईल अशी प्रतिक्रिया ही आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली.

आरक्षणाचा प्रश्न सरकार सोडविणार.

मराठा आरक्षण धनगर आरक्षण ओबीसी आरक्षण याबाबत सरकार गांभीर्य पूर्वक काम करीत आहे. ओबीसी आरक्षणाचा विषय आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून आंदोलनाचा विषय स्थगित केला आहे. आरक्षणाच्या सर्व प्रश्नांबाबत सरकार संवेदनशील असून मराठा ओबीसी व धनगर या समाजाला त्यांच्या मागणीनुसार आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या प्रश्न सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत असे आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

तर हक्कभंग आणू

विधानसभा अध्यक्षांवर ज्या पद्धतीने बाजार संजय राऊत व ऊबाठा शिवसेनेकडून दबाव तंत्राचा वापर होत आहे तो पाहता या नेत्यांवर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव आणखी मजबूत होईल. मग ते संजय राऊत असो, अनिल परब असो किंवा आणखी कोणी असो! विधानसभा अध्यक्ष हे न्यायालयीन कामकाज पाहत आहेत, सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांवर सुटले आहेत व ते न्यायालयीन कामकाज करीत आहेत मात्र त्यांच्यावर आणला जात असलेल्या दबाव हा चुकीचा आहे बेकायदेशीर आहे. याबाबत आपण हक्कभंग आणूच. व यातून खासदारकी रद्द होऊ शकते, जेल होऊ शकते अशी प्रतिक्रिया ही यासंदर्भात बोलताना आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली.

विनायक राऊत जागेपणी आता स्वप्न रंगवू लागले

शिंदे गटाकडे गेलेले आमदार खासदार परत येणार असे वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी नुकतेच केले आहे. याबाबत पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता आमदार नितेश राणे म्हणाले खासदार राऊत यांना पूर्वी झोपेत असताना स्वप्न पडायची. आता त्यांना जागेपणी स्वप्न पडू लागली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवसेना असून त्यांच्याकडे असलेल्या आमदार व खासदार यांचे संख्याबळ मजबूत आहे. असे आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले.