जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कासार्डे विद्यालयाचे १५ मल्ल अव्वल…

कणकवली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी निर्विवाद वर्चस्व राखले आहे.

कासार्डे विद्यालयाच्या खेळाडूंनी विविध वयोगट व वजनी गटात अव्वल स्थान पटकावत स्पर्धेत बाजी मारली आहे. या स्पर्धेत कासार्डे विद्यालयचे एकुण २२ खेळाडू यशस्वी ठरले आहेत.तर १५ कुस्तीपट्टुंची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतील यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे-

१४ वर्षा खालील मुलांच्या गटात –

अमोल दीपक जाधव-(प्रथम), आर्यन नारायण राणम- (प्रथम), सोहम सत्यवान पाटील-(द्वितीय), आदर्श मोहन राठोड (प्रथम), विघ्नेश संतोष पेडणेकर-(प्रथम),

१४ वर्षाखालील मुलींच्या गटात-

धैर्या अरविंद परब -(प्रथम), सृष्टी दीपक राणे-(द्वितीय), सना रहमान शेख-(प्रथम), दुर्वा प्रकाश पाटील (तृतीय), मुग्धा भरत पाताडे- (द्वितीय), विधी संजय चव्हाण- (प्रथम), उर्वी गुरुप्रसाद पाटील-

(द्वितीय),मृणाल संदीप सावंत-(प्रथम),

१७ वर्षाखालील मुलांच्या गटात –

फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा

किशोर बाबूलाल देवासी -(प्रथम),आराध्य प्रवीण तळेकर-(द्वितीय),तर ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत-दुर्वा संजय पवार-(प्रथम), व आर्यन अजय कदम -(प्रथम), १७ वर्षाखालील मुलींच्या गटात- रिद्धी अरविंद परब-(प्रथम),साक्षी संतोष तेली-(प्रथम), आसावरी हर्षकांत तानवडे-(द्वितीय),१९ वर्षाखालील मुलींच्या गटात- भक्ती महेश लाड-(द्वितीय), नंदिता प्रवीण मत्तलवार-(प्रथम), राखी संजय आलव-(प्रथम), या यशस्वी खेळाडूंना विद्यालयचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,प्रशिक्षक अभिजित शेट्ये,सोनू जाधव विद्यालयचे मार्गदर्शक शिक्षक सौ.डंबे मॅडम,प्रा.दिवाकर पवार,अवधुत कानकेकर,ऋषिकेश खटावकर व क्रीडा विभागातील इतर शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी कुस्तीपट्टुंचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. विद्या शिरस , तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, तसेच कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर,सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर, विद्यालयचे प्राचार्य एम.डी.खाड्ये,पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर ,जेष्ठ शिक्षिका सौ बी.बी.बिसुरे, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन कोल्हापूर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या