शाहरुख शेख यांची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड

 

उत्तर प्रदेश मध्ये नॉयडा येथील इंदोर स्टेडियम येथे दिनांक 5 ते 8 ऑक्टोबर 2023 रोजी ओपन नॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप आयोजन. केले आहे या स्पर्धेसाठी एस आर के तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच श्री शाहरुख निसार शेख यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. गेली 15 वर्षे एस आर के तायक्वांदो क्लब माध्यमातून अनेक राष्ट्रीय व राज्य खेळाडूंना मार्गदर्शन लाभत आहे, गेली अनेक वर्ष रत्नागिरीतील कित्येक खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. तसेच साध्या एस आर के तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष व रत्नागिरी तालुक्याचे सचिव म्हणून कार्य करत आहेत राष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून त्यांची झालेली निवड रत्नागिरी करांसाठी अभिमानास्पद असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय श्री उदयजी सामंत यांनी अभिनंदन केले तसेच तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ईषारी गणेश, सचिव आर डि मंगेशकर तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सेक्रेटरी मिलिंद पाठारे, खजिनदार व्यंकटेशराव करा, रत्नागिरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण करा, कोषाध्यक्ष शशांक घडशी पंचप्रमुख भरत करा/कृणाल चव्हाण, तालुकाध्यक्ष राम कररा,उपाध्यक्ष मिलिंद भागवत, कोषाध्यक्ष प्रशांत मकवांना, एस आर के तायक्वांदो क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत, सचिव शितल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, यांनी शुभेच्छा दिल्या.