जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत राजापूर तालुका संघाची २४ पदकांची कमाई

राजापूर (वार्ताहर): रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन आणि शहानुर चिपळूण तालुका तायक्वांदो अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने 23 वी सब -जुनियर व जुनियर 8 वी कॅडेट तसेच 23 वी सिनियर क्यूरोगी व पुमसे स्पर्धा 2 ते 4 ऑगस्ट स्वामी मंगल कार्यालय चिपळूण येथे पार पढली. या स्पर्धेसाठी जिल्हाभरातील 500 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत राजापूर तालुक्यातील 25 खेळाडूंनी राजापूरचे प्रतिनिधित्व करत 15 सुवर्ण पदक, 5 रौप्य पदक, 4 कांस्य पदकाची कमाई केली. याच बरोबर गत 8 वर्षाची परंपरा कायम राखत या वर्षी ही राजापूर तालुक्यातील 3 खेळाडू बेस्ट फायटर चे मानकरी ठरले. यामध्ये यज्ञेश जगदीश पेणकर हा सब-जुनियर गटात रिया मुकेश मयेकर ही जुनियर गटात तर पूर्वा संदीप राऊत हिने सिनियर गटात हा ‘किताब पटकावला.
विविध गटात झालेल्या या स्पर्धेत सुवर्णपदक विजेते खेळाडू श्वेत मुकेश नाचरे, यज्ञेश जगदीश पेणकर, युवराज मंदार पेणकर, वेदांत नरेश रहाटे, द्रोण संदीप चव्हाण, मिताली मोहन घुमे, शुभ्रा विवेक गुरव, आयुष संतोष बावकर, श्रीपाद दिपक गवंडी,
रिया मुकेश मयेकर, गार्गी संजय बाकाळकर, पूर्वा संदीप राऊत, गौरव दिपक धालावलकर, रौप्य पदक विजेते खेळाडू नक्ष परुशुराम पवार, आदित्य अभिजित तेली, वैष्णवी विजय पाटील 2 रौप्य अंश राजन गुंडये ,कांस्य पदक विजेते खेळाडू मृदुला मोहन घुमे.
नियमित पुमसे प्रकारात रिचा संजय मांडवकर हिने वरिष्ठ गटात सुवर्ण पदक पटकावले तर गार्गी संजय बाकळकर हिने फ्री स्टाईल पूमसे या प्रकारात सुवर्ण पदक पटकावले व काव्या प्रसाद शिवलकर हिने फ्री स्टाईल पूमसे प्रकारात कांस्य पदक पटकावले. निहाल नितीन आंबेरकर, हृदया नवनीत शिंदे, दार्शी मंदार भोसले, तिथी दादा झेंडे, वेदिका नरेश रहाटे, रुद्र दादा झेंडे या खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत राजापूर हायस्कूल राजापूर,नॅशनल इंग्लिश स्कूल रानतळे, आर. एस. पी एम. इंग्लिश मीडियम स्कूल आंबेवाडी, विश्वनाथ विद्यालय, गोखले कन्याशाळा व इमेन्स पब्लिक स्कूल या प्रशाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
विजेत्या खेळाडूंना तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश राव कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, संचालक संजय सुर्वे यांनी शुभेच्छा दिल्या.
तायक्वांदो अकॅडमी राजापूर चे अध्यक्ष अभिजित जनार्दन तेली उपाध्यक्ष मुकेश मयेकर खजिनदार संजय मांडवकर, सदस्य दिपक धालवलकर, संदीप राऊत , प्रसाद शिवलकर , सौ. मानसी दिवटे, सौ दीपिका पवार, अद्वैत अभ्यंकर, ,निलेश रहाटे यांनी सुद्धा सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व खेळाडूंना राजापूर तालुकाप्रमुख प्रशिक्षक मुकेश शांताराम नाचरे व त्याच्या पत्नी सौ. मधुरा नाचरे सह प्रशिक्षक अंश गुंडये, गौरव धालवलकर हे मार्गदर्शन करत आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत श्रुतिका संजय मांडवकर, हितेंद्र तानाजी सकपाळ व आकाश योगेंद्र बरई यांना पंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
फोटो 8 आरजेपी 5
जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्राविण्य मिळविलेले राजापूर तालुका संघाचे खेळाडू व मार्गदर्शक मुकेश नाचरे व अन्य.